वालाची गोडी आमटी

less than 1 minute read

Updated:

घटक, 3 सर्व्हिंग्ज

  • 1 कप सोललेले वाल
  • 7-8 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे
  • 1/2 कप ओला नारळ
  • 1 टीस्पून जिरे
  • 1 टेबलस्पून धणे
  • 7-8 मिरे दाणे
  • 1 टेबलस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून तांदूळ पीठ
  • चवीनुसार मीठ
  • 1-1.5 टेबलस्पून गुळ
  • 1 टेबलस्पून तूप
  • 1/2 टीस्पून जिरे, हिंग फोडणी साठी
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर

पायर्‍या

प्रथम एक कप सोललेले वाल आणि शेंगा तुकडे धुवून घ्या. भांड्यात तूप घालून जिरे, हिंग फोडणी करा. मग त्यात वाल, शेंगा घालून मिक्स करा आणि वाफेवर थोडे पाणी टाकून 5-10 मिनिटे शिजवा. धणे, जिरे,मिरे थोडे कढई मध्ये भाजून घ्या आणि मग मिक्सर मध्ये नारळ आणि ते घालून बारीक वाटून घ्या. वाटताना त्यात लाल तिखट घालावे.

आता हे मिश्रण वाल शेंगा भाजीत घालून मिक्स करुन परत वाफेवर शिजवून घ्यावी. वाल शिजला की त्यात मीठ, गुळ घालावे. भाजीला दाट पणा येण्यासाठी तांदूळ पिठात थोडे पाणी घालून ती पेस्ट आमटीत घाला आणि आमटी चांगली उकळा. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करा.(वाल शिजवताना काळजी घ्यावी, खूप जास्त शिजले तर त्याचा गोळा होतो, म्हणून साधारण बोटाने चेपले गेले की शिजला असे समजावे) ही आमटी ताक भात, साधे वरण भात, पोळी याबरोबरच छान लागते.

Step 1 Step 2